Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशी कोणतीही योजना नाही..

सावधान..! ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशी कोणतीही योजना नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त:-सोशल मीडियाचे जाळे दूरवर पसरल्याने आज अनेकजण याचा वापर विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर करतांना दिसून येतात. मात्र,यातील काही बाबी खऱ्या असतात,तर काही बाबींची शहानिशा करणे गरजेचे असते.अन्यथा फसवणूक व विविध समस्यांना सामोरे जाऊन सर्वकाही गमावून बसण्याची वेळ येत असते.अश्याच प्रकारे काही कालावधीपासून सोशल मीडियाच्या विविध समाजमाध्यमांवर इयत्ता ५ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना सूचना, ‘मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना’आपणा सर्वांना विनंती आहे की ०१ मार्च २०२० नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे.अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी ४०००/- दरमहा मिळणार आहेत.हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्या.
कागदपत्रे –
१. बाळ आणि आई एकत्र खाते
२. शिधापत्रिका
३. आधार कार्ड (आई आणि मुलासाठी)
४. शाळेचे ओळखपत्र / मुख्याध्यापकांनी लिहिलेले
५. वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
६. उत्पन्नाचा पुरावा (७२०००/७५०००)
फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट/जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा.
टीप – जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत.
अधिक माहिती साठी विद्यार्थ्यांनी ९६१५१५५००५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
अश्याप्रकारे एका कागदावर लिहिलेले आणि त्यावर सही,शिक्का असलेली माहिती सर्वत्र फिरू लागली आहे.मात्र,महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय(MAHARASHTRA DGIPR) यांनी याबाबत खुलासा सादर केला आहे.
समाजमाध्यमांवर ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने’बाबत पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाअंतर्गत ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही.त्यामुळे,व्हायरल झालेल्या पोस्टमधील सर्व दावे हे खोटे ठरतात.व्हायरल नोटीसवर कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील वेंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांची स्वाक्षरी आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे; असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी म्हटले आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!