Wednesday, August 5, 2026
Homeचंद्रपूरकां यार..! तहसीलदारांना 'एंट्री' मिळते तरी आमचे ट्रॅक्टर कां पकडता?

कां यार..! तहसीलदारांना ‘एंट्री’ मिळते तरी आमचे ट्रॅक्टर कां पकडता?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-हल्ली अवैध रेतीचा उपसा करणाऱ्या तस्करांच्या मोठ्या गंमतीशीर तितक्याच मुजोरीच्या
घटना सर्वत्र उघडकीस येऊ लागल्या आहेत.नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील उसेगाव येथील रेती घाटावर महसूल पथकातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. त्यातच आता चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख रेती घाटावरून अवैधरीत्या रेती वाहतूक करीत असतांना पोलिस पाटलासह काही पथक कारवाईला गेले असता वाटेतच काही रेती तस्करांनी कां यार..! तहसीलदारांना  ‘एंट्री’ मिळते तरी आमचे ट्रॅक्टर कां पकडता? म्हणून हातात विटा घेऊन पथकाला धक्काबुक्की करून रेती तस्कर पसार झाले असल्याची घटना शनिवारी ५ एप्रिलच्या रात्री अडीच वाजता घडली.मात्र,याही घटनेची तक्रार पोलिसांत दाखल झाली की नाही? शंकाच उपस्थित केली जात आहे.त्यामुळे पाणी कुठेतरी पूर्णपणे मुरल्या गेले असल्याची चर्चा आहे.
भद्रावती तालुक्याच्या पिपरी घाटातून दहा ट्रॅक्टर अवैध रेती उपसा करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.त्यानुसार तलाठी अनिल गहूकर,तलाठी विनोद चिकटे,कोतवाल संदीप रामटेके,कोतवाल रंजिता डोंगे,पोलिस पाटील सुनीता ठोंबरे, रत्नाकर ठोंबरे हे रेतीघाटावर दाखल झाले.पथक पाहताच रेती घाटातून रेती तस्कर परस्पर इकडे-तिकडे पसार झाले.यातील एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला.पथकाने ट्रॅक्टरला घेराव घातला.काही मुजोर रेती तस्कर हातात विटा घेऊन उभे झाले व संधीचा फायदा घेत पसार झाले.दिवसेंदिवस रेती चोरांची हिंमत आणखीनच वाढत चालली आहे.काही अधिकारी खुर्चीवर बसूनच डेंगे हाकत असतात.मात्र, खालच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.ही सत्य परिस्थिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!