- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-लग्नाच्या जेवणातून ७० लोकांना विषबाधा होऊन दोन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात औषधोपचार सुरू आहेत.सदरची धक्कादायक घटना तालुक्यातील ग्राम बबई येथे शनिवारी घडली.गोरेगाव तालुक्यातील ग्राम बबई येथील केशोवराव बिसेन यांच्याकडे गुरुवारी ३ एप्रिलला मुलाचा लग्नसमारंभ होता.शुक्रवारी ४ एप्रिल रोजी परतीची वरात बबई येथे आल्यानंतर उपस्थित वऱ्हाडी आणि गावकऱ्यांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास जेवण देण्यात आले.मात्र,या जेवणातून जवळपास ७० लोकांना विषबाधा झाली असून,यात आठ बालकांचा समावेश असतांनाच दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.यामुळे त्यांना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.२९ रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात, एका खासगी रुग्णालयात चार रुग्ण,चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच रुग्ण,आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तीन रुग्ण,तर गोंदिया येथील खासगी रुग्णालयातही काही रुग्ण उपचार घेत आहेत.शनिवारी ५ एप्रिल च्या सकाळी नऊ वाजल्यापासूनच विषबाधा झाल्याने अनेक रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. दिवसभर त्यांना उपचार दिले गेले.मात्र रविवारी ६ एप्रिलच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना लगेच गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली.
लग्नसोहळ्याच्या जेवणातून झालेल्या विषबाधेच्या धक्कादायक घटनेमुळे बबईवासी चांगलेच दहशतीत आहे.लहान चिमुकल्यांपासून तर वृद्धांना विषबाधा झाली आहे.या गंभीर घटनेची आरोग्य विभागाने काल रविवारी ६ एप्रिलला दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद चौहान यांच्या मार्गदर्शनात २८ रुग्णांची तपासणी केली.यात २६ रुग्ण सौम्य विषबाधा झालेले आहेत; तर दोन रुग्णांवर कॅम्पमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.या कॅम्पला अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी भेट दिली व घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
- Advertisement -

