Saturday, June 13, 2026
Homeचंद्रपूरऑर्डनन्स फॅक्टरींना दारूगोळा उत्पादन वाढीचे निर्देश.. - युद्धाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता..

ऑर्डनन्स फॅक्टरींना दारूगोळा उत्पादन वाढीचे निर्देश.. – युद्धाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यातील भद्रावती आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी)मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.ज्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आधी मंजूर झाल्या,त्यांनाही कामावर तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.फक्त वैद्यकीय कारणास्तवच सुट्टी मंजूर करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून येथील आयुध निर्माणीला दारूगोळा उत्पादनाच्या वाढीचे निर्देश देण्यात आले आहे.त्यासाठी येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. भद्रावती येथील आयुध निर्माणी कारखाना हा चांदा आयुध निर्माणी म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो. पुढील सहा महिने पुरेल एवढा शस्त्रसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट इथे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर झालेला तणाव लक्षात घेता केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता पडू नये,यादृष्टीने देशातील सर्व आयुध निर्माणींना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!