Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजइंदूताई नाकाडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्सवात साजरा..

इंदूताई नाकाडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्सवात साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या शासकीय इंदूताई नाकाडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थेतील अधिकारी,कर्मचारी वृंद तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्य घटना स्वीकारण्यात आल्याने दरवर्षी २६ नोव्हेंबर हा “संविधान दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. संविधानाने सर्वांना सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय,विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची समानता व संधीची समानता प्राप्त करून दिली आहे.त्यामुळेच संपूर्ण देश संविधानाच्या भरवशावर चालत आहे.याच दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबरला शासकीय इंदूताई नाकाडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “हमारा संविधान -स्वाभिमान” या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजनेच्या(NSS) वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एस. चौधरी प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी व उपस्थित प्रमुख अतिथिंच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व संविधान या महान ग्रंथाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून अमित मोराडे जिल्हा समन्वयक अनुलोम संस्था यांनी संविधान या विषयावर सखोल  मार्गदर्शन केले. संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांचे भाषण व आर.सी.निखाडे यांनी भीमगीत सादर केले.चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात संविधानाचे महत्त्व पटवून दिले.संविधान प्रस्तावना वाचन,संविधान शपथवाचन करण्यात आले आणि राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाचे समारोप झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा सहारे एनएसएस स्वयंसेविका,प्रास्ताविक सी.एम गरमळे  व आभार प्रदर्शन व्ही.वाय.नागमोती सह समन्वयक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम केले.कार्यक्रमाकरिता संस्थेतील सर्व शिक्षकवृंद,कर्मचारीवृंद आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!