Saturday, July 11, 2026
Homeआरमोरीआरमोरी तालुक्यात बदमाश रानटी हत्तींचा उपद्रव सुरुच..

आरमोरी तालुक्यात बदमाश रानटी हत्तींचा उपद्रव सुरुच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे  शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत.नैसर्गिक संकटाने बेजार झालेले शेतकरी आता रानटी हत्तींच्या नासधुसीमुळे चिंताग्रस्त होऊन मोठ्या विवंचनेत सापडले आहेत.अशातच आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरात रानटी हत्तीचा उपद्रव सुरुच आहे.शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असलेल्या शेतातील सोलर पॅनलची तोडफोड करून विहिरीत असलेली तब्बल ३५ फूट खोलीतील मोटर बाहेर काढून फेकल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरमोरी तालुक्याच्या देलोडा(बु.)येथील शेतकरी केशव शालीकराम म्हशाखेत्री यांची गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बोडधा चक शेतशिवारात शेतजमीन आहे.दरम्यान,शनिवारच्या रात्री हत्तीच्या कळपाने म्हशाखेत्री यांच्या शेतात प्रवेश केला.धान पिकाची कापणी केली असल्याने सर्वप्रथम हत्तींनी कापणी केलेल्या धानाच्या कडपांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.अडीच एकरातील धानपीक कापणी केली असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले.त्यानंतर हत्तींनी आपला मोर्चा शेतामध्ये विहिरीवर बसविलेल्या सोलर पंपाकडे वळविला.हत्तींनी सोलर पॅनलची तोडफोड केली.बदमाश हत्ती एवढ्यावरच न थांबता विहिरीमध्ये असलेली मोटार सोंडाच्या सहाय्याने बाहेर काढून फेकली.तसेच पाईपचेही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी धानाची नासाडी,तर कधी जमा केलेल्या पुंजण्याचीही नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!