- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-तालुक्यातील एकोडी गावात मन हेलावणारी घटना घडली आहे.चक्क घराच्या आवारात असलेल्या विहिरीतील पाण्यात एक दिवसाच्या बाळाचे मृत अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.सकाळच्या सुमारास विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेले असता सदरची घटना उघडकीस आली आहे.प्रकरणी गोंदिया येथून फॉरेन्सिक पथकास पाचारण करण्यात आले. मृत अर्भक विहिरीबाहेर काढून पथकाच्या प्राथमिक तपासणीत मृत अर्भक हे एक दिवसाचे व मुलाचे असल्याचे स्पष्ट झाले.बाळाचा मृत्यू झाल्यावर त्याला विहिरीत फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.अर्भक शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान,याप्रकरणी एकोडी गावातील एका संशयित कुटुंबाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच यातील नेमके सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती अशी की,गोंदिया तालुक्याच्या एकोडी गावातील राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घराच्या आवारात विहीर असून त्यांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे काल शनिवारी सकाळच्या सुमारास विहिरीचे पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ गेले.विहिरीत पाहतात तो काय पाण्यात एक मृत अर्भक तरंगताना दिसून आला. सदरची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली.लागलीच घटनेची माहिती गंगाझरी पोलिस ठाण्याला मिळताच घटनास्थळी पीएसआय सुधीर वर्मा पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.घटनेने परिसरात शंका-कुशंका वाढीस लागून चर्चेला उधाण आले आहे.
- Advertisement -

