Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजआमदार मसराम यांच्या उपस्थितीत नैनपूर शाळेत तान्हा पोळा उत्सव..

आमदार मसराम यांच्या उपस्थितीत नैनपूर शाळेत तान्हा पोळा उत्सव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे आज,शनिवार २३ ऑगस्ट रोजी पारंपरिक तान्हा पोळा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे सादरीकरण व परंपरेप्रती असलेले प्रेम पाहून त्यांनी कौतुकाची थाप दिली.तसेच शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देऊन प्रोत्साहनही दिले.प्रसंगी माजी सभापती परसराम टिकले,प्रज्ञा तिघरे,लायन्स क्लब ब्रम्हपुरीचे अध्यक्ष गणेश सामृतवार,चेअरपर्सन रामकुमार झाडे, सचिव किरण झाडे,सदस्य तरल झाडे,वनपरिक्षेत्र अधिकारी कमलेश गिन्नलवार,किशोर माडावार,गंगाधर चांदेवार (माजी पोलीस पाटील),शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम,गजानन कवासे, उमाकांत कवासे, लूणकरन चौधरी,शिक्षक हाके,लालाजी रामटेके, गुणेश्वर उरकुडे,शिक्षिका तिघरे,विनोद नखाते, सुरेश बुल्ले यांचेसह शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी आमदार मसराम यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना तान्हा पोळ्याचे सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कलांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.यात “मोलाईचा जंगल” ही नाटिका टाळ्यांचा गजरात रंगली. “वो किसना है” या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.स्वागत गीत व शब्दसुमनाद्वारे मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कु.रेणू तिघरे हिने साकारलेली शिवलिंग पिंड हे विशेष आकर्षण ठरले. त्यातच स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले.यात प्रथम-कुंज नामदेव चांदेवार (संत गोराकुंभाराच्या भूमिकेत नंदीबैल सजवून सादरीकरण),द्वितीय-पुर्वांशी कमलेश मुळे तर तृतीय क्रमांक रुद्र नितीन देवगिरीकर या विद्यार्थ्याचा आला.प्रसंगी लूणकरन चौधरी यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला ६ खुर्च्या भेट देण्याचे आश्वासन दिले.तसेच वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे प्रदान करण्यात आली.लायन्स क्लब ब्रम्हपुरी यांच्या सौजन्याने संपूर्ण बक्षीस वितरण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश तुपट यांनी केले,तर आभार प्रदर्शन अपर्णा जडे यांनी मानले.सदर कार्यक्रम लायन्स क्लब ब्रम्हपुरी तथा शाळेतील शिक्षकवृंदाच्या सहकार्याने  यशस्वीरीत्या संपन्न झाला.परंपरा,संस्कृती आणि शिक्षणाचा संगम घडवून नैनपूर शाळेने आदर्श निर्माण करून गावकरी,पालक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून  पोळा सण परंपरेला साजेसा आणि प्रेरणादायी ठरला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!