Thursday, September 3, 2026
Homeभंडाराअल्टो कारमधून आले अन् सपासप वार करून निघून गेले.. - दोन तरुणांची...

अल्टो कारमधून आले अन् सपासप वार करून निघून गेले.. – दोन तरुणांची निघृण हत्या; एकजण शिंदे सेनेचा पदाधिकारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहरात एखाद्या चित्रपटाच्या कथानक सारखी खळबळजनक घटना काल शनिवारच्या रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.भंडारा शहराच्या मुस्लीम लायब्ररी चौक ते मिस्किन टँक गार्डन मार्गावर
अज्ञात हल्लेखोर एका अल्टो कारमधून धाडकन खाली उतरले आणि दोन तरुणांजवळ जात तरुणांना काही कळायच्या आत दोघांवर सपासप चाकूने वार करून निघृण हत्या करून अल्टो कारनेच पळून गेले.अचानक घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली.टिंकू उर्फ वसीम खान व शशांक गजभिये अशी मृतांची नावे असून टिंकू खान हा शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी होता.वार करताच दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.जखमी झालेल्या दोघांनाही तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षकांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात पाठवले.शहरात तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी शहरातील मुख्य चौकात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. अचानक घडलेल्या घटनेने शहरात तणावाचे वातावरण आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!