Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंज"एक राखी सैनिकांसाठी” नैनपूर वार्ड नगरपरिषद शाळे तर्फे देशप्रेम व पर्यावरण संवर्धनाचा...

“एक राखी सैनिकांसाठी” नैनपूर वार्ड नगरपरिषद शाळे तर्फे देशप्रेम व पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वार्ड देसाईगंज येथे “एक राखी सैनिकांसाठी” उपक्रम उत्साहात पार पडला. काल शनिवारी रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून पर्यावरणप्रेम जपले,तर वर्गातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकमेकांना राखी बांधून आपुलकीचे बंध दृढ केले.सदर उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी केले.तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य शिक्षक ईश्वर गहाने व मंगेश तूपट यांनी केले.राखी बनविणे व निरुपयोगी वस्तूंपासून उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक शिक्षिका जडे व सुखदेवे यांनी दिले.तर कार्यक्रमाचे संचालन प्राची खरकाटे,प्रियंका तलमले यांनी केले.शाळेतर्फे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ संदेश तथा लिखित शुभेच्छा राख्यांसोबत सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात आल्या. “जसा वृक्ष मुळांच्या आधारावर वाढतो,तसाच देश सैनिकांच्या धैर्यावर उभा आहे.वृक्ष संवर्धन करा,पर्यावरण वाचवा आणि देशसेवेसाठी सदैव तत्पर राहा.”असा शाळेतर्फे प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!