Tuesday, June 23, 2026
Homeचंद्रपूरअन् वाघ त्याच्याकडे… अन् 'तो' वाघाकडे बघतच राहिला..!-झटक्यात वळली बोबडी…

अन् वाघ त्याच्याकडे… अन् ‘तो’ वाघाकडे बघतच राहिला..!-झटक्यात वळली बोबडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार,हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच ग्रामस्थांचा थरकाप उडतो आणि तो अचानक समोर आला तर भीतीने बोलतीही बंद होते.असाच प्रकार नागभीड तालुक्यात उघडकीस आला.गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा येऊन ठाकला. त्यामुळे शेतकऱ्याची बोबडी वळली.मात्र,त्याच वेळी तिथे एसटी महामंडळाची बस आली.बसचालक या शेतकऱ्यासाठी देवदूतच ठरला.चालकाने प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला बसमध्ये घेऊन त्याचे प्राण वाचविले.

पावसातच शेतकऱ्यांचे आपापल्या शेतातील रोवणी आटोपण्याकडे लक्ष लागले आहे.पावसातही शेतकरी शेतावर जावून रोवणीची तयारी करीत आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खानदेवे हा शेतकरी मांगरूड शिवारातील शेतावर सायकलने आले होते.शेतावरील काम आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेतकरी आपल्या गोंविंदपूर या गावी सायकलने जायला निघाला.मांगरूड ते गोविंदपूर या मार्गाने नहराच्या समोरील

नागमोडी वळणावर जाणार इतक्यातच अचानक वाघोबा जंगलातून रस्त्यावर आला.दोघेही एकमेकासमोर उभे ठाकले.प्रत्यक्ष वाघोबाच समोर उभा असल्याने शेतकरी निःस्तबध्द झाला.जीवाचे काहीबरेवाईट होईल तेवढ्यातच मांगरूड वरून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस आली.वाघ आणि शेतकरी दोघेही एकमोसमारे उभे असल्याचा थरारक प्रसंग त्यांनी बघितला. Lलगेच चालकाने एसटी थांबविली.शेतकऱ्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसविण्यात आले.’वेळ आली होती पण, काळ आला नव्हता’ त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला.एसटी बस गोविंदपूर गावात पोहचली आणि त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!