Friday, October 16, 2026
Homeभंडाराअजब-गजब कारनामा…!अन् ग्रामसेवकानेच पकडुन दिले विस्तार अधिकाऱ्यास….-१० हजारांची लाच घेतांना विस्तार अधिकारी...

अजब-गजब कारनामा…!अन् ग्रामसेवकानेच पकडुन दिले विस्तार अधिकाऱ्यास….-१० हजारांची लाच घेतांना विस्तार अधिकारी अडकला ‘लाच लुचपत विभागाच्या’ जाळ्यात…-भंडारा जिल्ह्यातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- नवीन वर्षात नवीन उद्घाटन झाल्याचे आजच्या प्रकारावरून दिसून येत आहे.ग्रामसेवकाच्या विरोधात असलेला आक्षेप हटविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या साकोली पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई आज दिनांक – २ जानेवारी रोजी करण्यात आली.खिलेंद्र देवरलाल टेंभरे वय ५३वर्षे असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव असून यातील तक्रारदार हे ग्रामसेवक आहेत.ते साकोली तालुक्यातील किन्ही (मोखे) ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना २०१८-१९ मध्ये रस्ता डांबरीकरणाच्या कामासाठी १५० टिन डांबर हे ३ हजार रुपये प्रति टिन या दराने निविदा मागवून ग्रामपंचायतव्दारे खरेदी करण्यात आले होते.२०२३ मध्ये किन्ही ग्रामपंचायतचे ऑडिट झाले.सदर ऑडिट रिपोर्टमध्ये तक्रारदार ग्रामसेवक यांनी १ हजार रुपये प्रति टिन डांबर प्रमाणे खरेदी न करता ३ हजार रुपये प्रति टिन या दराने डांबर खरेदी केल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला होता.विस्तार अधिकारी खिलेंद्र देवरलाल टेंभरे यांनी तक्रारदार ग्रामसेवक यांना रस्ता डांबरीकरणाचे कामामध्ये मंजूर दरापेक्षा ३ लाख रुपये जास्त प्रदान केल्याने ३ लाखांची वसूली तुमच्याकडून केली जाणार; असे ग्रामसेवक यांना सांगितले.ही वसुली त्यांच्याकडून होऊ द्यायची नसेल आणि जिल्हा परिषदेस सदर ३ लाख रुपये वसुलीबाबतचा अहवाल न पाठवता; आक्षेपाचा निपटारा करुन तसा अहवाल पाठवायचा असेल तर त्या मोबदल्यात विस्तार अधिकारी खिलेंद्र देवरलाल टेंभरे यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी गेली.तक्रारदार यांची १० हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली.तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता १० हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न होऊन सापळा रचण्यात आला.सापळा करवाई दरम्यान खिलेंद्र टेंभरे यांनी १० हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष स्वीकारले. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असल्याने एकाच व्हिभगतील कर्मचारी व अधिकारी यांचा झांगडगुत्ता झाल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!