Monday, July 13, 2026
Homeनागपूरवर्षभर घेतला उपचार अन् डॉकटर निघाला झोलाछाप - नागपूर येथील घटना…

वर्षभर घेतला उपचार अन् डॉकटर निघाला झोलाछाप – नागपूर येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- कोणतीही वैध डिग्री नसतांनाही तोतया डॉक्टर,उपचाराचा देखावा करीत रुग्णांच्या जीवाशी खेळत होता.वर्षभर उपचार घेऊनही महिला रुग्णाला कुठलाच आराम झाला नाही.त्यावर त्याने तिला अश्लील मेसेजही पाठविले.शंकेपोटी महिलेच्या कुटुंबियांनी शोधाशोध केली.त्यात तो झोला छाप डॉक्टर असल्याचे समोर आले.कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर या तोतया डॉक्टरचा भांडाफोड झाला.प्रथमिक तपासानंतर सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नागपूर येथील सदरच्या श्रीराम टॉवर येथे द ब्युटीफूल माईंड क्लिनिक आहे.विजय त्रिवेदी येथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करतो. गिट्टीखदान परिसरात राहणारी ७१ वर्षीय महिलेच्या सुनेला सौम्य स्वरुपाचा मानसिक आजार आहे. त्या तिला क्लिनिकमध्ये घेऊन गेल्या.५ जानेवारीपासून उपचार सुरू होते.वर्षभर उपचार घेऊनही आराम मिळाला नाही.यामुळे सुनेला दुसऱ्या डॉक्टरकडे नेले. तिथे यापूर्वी कुणाकडे उपचार घेतले.अशी विचारणा करण्यात आली.डॉ.त्रिवेदी नाव सांगितले असता नव्या डॉक्टरांनी या नावाचा या क्षेत्रात कोणताच डॉक्टर नसल्याचे सांगितले.त्यामुळे सासूने इंटरनेटवर सर्च केले. तेथेही कोणतीच माहिती मिळाली नाही.त्रिवेदी बनवाट डॉक्टर असल्याची खात्री झाल्यानंतर वृद्ध सासूने पोलिसांत तक्रार दिली.त्रिवेदी याच्याकडे कुठल्याही प्रकारची डीग्री नसताना त्याने सायकॉलॉजीची बनावट डीग्री खरी असल्याचे भासवून रुग्णावर उपचार करीत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!