Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजनिवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा 'एक ना धड भाराभर चिंध्या' -आमदार...

निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ -आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सचिव, सचिन वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देसाईगंज येथील माता वार्डातील गजानन मंदिर सभागृहात मोफत शासकीय योजना शिबीर व पत्रकार तसेच कारसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.सदर समारंभ प्रसंगी लोकप्रतिनीधी हा जनतेचा मालक नसुन  जनसेवक आहे.त्यामुळे निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या असे झाल्याशिवाय राहणार नाही.

त्या करीता लोकांशी संवाद साधणेही तेवढेच गरजेचे आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सार्वजनिक उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.देसाईगंज येथील माता वार्डातील गजानन मंदिर सभागृहात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सचिन वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देसाईगंज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत शासकीय योजना शिबीर व पत्रकार तसेच कारसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असता प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार गजबे प्रसंगी बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,माजी नगराध्यक्षा शालु दंडवते,श्याम उईके,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी,माजी नगरसेवक राजु जेठानी,नरेश विठ्ठलानी, सचिन खरकाटे,वसंता दोनाडकर,हेमा कावळे,दादाजी नाकतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान पुढे बोलतांना आमदार गजबे म्हणाले की,शासकीय स्तरावरुन अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जातात.मात्र काही कारणास्तव त्या लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने लोकांना त्याचा फायदा होत नाही.असे होऊ नये म्हणून पक्षाच्या वतीने लोकसंवाद साधण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे औचित्य साधून राबविण्यात येत असलेल्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवीण्यात व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्यातील पत्रकार तसेच कारसेवकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी २०७ लाभार्थ्यांनी आभा कार्ड,१४० नागरिकांनी पॅन कार्ड व २१० नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून उपक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक चैतनदास विधाते यांनी तर आभार सचिन वानखेडे यांनी मानले.सदर कार्यक्रमास शहरातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!