Friday, June 26, 2026
Homeचंद्रपूरअखेर १४ वा वित्त आयोगाच्या निधीची वाट लावणारा केंद्रचालक निलंबित...सरपंच,ग्रामसेवकावर होणार कारवाई...

अखेर १४ वा वित्त आयोगाच्या निधीची वाट लावणारा केंद्रचालक निलंबित…सरपंच,ग्रामसेवकावर होणार कारवाई …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल (चंद्रपूर):- गावाच्या विकासासाठी शासनाने १४वा वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला  लाखो रुपयांचा निधी दिला.प्राप्त निधी त्याच वित्तीय वर्षात खर्च करावयाचा असतो.मात्र, १४वा वित्त आयोगाचा कालावधी संपला असतांनाही ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे लाखो रुपयांचा निधी अखर्चित होता. सरपंच,ग्रामसचिवाच्या दुर्लक्षामुळेच विकासकामांच्या निधीचा गैरवापर केंद्रचालकाने केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मूल तालुक्यातील ग्रामपंचायत जूनासूर्ला येथील केंद्रचालकाने सरपंच व ग्रामसचिवाच्या डिजिटल सिग्नेचरचा गैरवापर करून पीएफएमएस प्रणालीद्वारे १४वा वित्त आयोगातील निधी आपल्या खात्यात परस्पर वळता केला.केंद्रचालकाने केलेला गैरव्यवहार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने अखेर प्रकल्प संचालकांनी सदर केंद्र चालकाला तात्काळ निलंबित केले.

डिजिटल सिग्नेचर ठेवण्याची जबाबदारी सरपंच, सचिवाची असताना केंद्रचालकाने डीएससीचा वापर करून निधी आपल्या खात्यात वळता कसा काय केला,सरपंच सचिव एवढे बेजबाबदार कसे? त्यामुळे सदर प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यात यावी व सरपंच,सचिवावर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गावातील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच,ग्रामसचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने सरपंच,ग्रामसचिवाचे धाबे चांगलेच दणाणले आहे.त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!