Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीहजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगभूमीवर साकारले गोंडवानाचा महायोध्दाचे क्रांतियुद्ध- प्रेक्षक झाले तल्लीन.....

हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगभूमीवर साकारले गोंडवानाचा महायोध्दाचे क्रांतियुद्ध- प्रेक्षक झाले तल्लीन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागड च्या सुपुत्राची, आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या  “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गडचिरोली येथे निःशुल्क सादर करण्यात आला.  रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे सदर प्रयोगाला दाद दिली. 

झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी  नाटकाचे लेखन केले असून,प्रसिद्ध गायक,दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा,नवी दिल्ली व गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने लोकजागृती संस्था चंद्रपूरच्या वतीने नाटकाची निर्मिती करण्यात आली. 

जिथे बंदुकीच्या जोरावर दाबून टाकण्यात आला सन १८५७ चा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा उठाव तिथे म्हणूनच जन्मास आला सन १८५८ चा आदिवासींचा सशस्त्र क्रांतीचा उठाव आणि या उठावाचे पहिले क्रांतिस्थळ होते गडचिरोली जिल्ह्यातील मोलमपल्ली जमीनदारी आणि पहिले आद्य क्रांतिकारक होते “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके”. या क्रांतिविराची गाथा प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करण्यात कलावंत यशस्वी ठरले.

नाटकाचे उद्घाटन डॉ.अनिल हिरेखन कुलसचिव यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.प्रमुख अतिथी म्हणून   देवराव होळी आमदार,नामदेव उसेंडी माजी आमदार,शिवप्रसाद गौड अतिथी प्राध्यापक,राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली,सचिन मडावी,सहा. आयुक्त सामाजिक न्याय विभाग,ॲड.राम मेश्राम माजी नगराध्यक्ष,माधव गावड अध्यक्ष,ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन,वसंत कुलसंगे,मारोतराव ईचोडकर माजी सभापती,शेखर डोंगरे झाडीपट्टी कलावंत व सामाजिक कार्यकर्ते मुनिश्वर बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

नाट्य प्रशिक्षण शाळेतील ३५ कलावंतांनी उत्कृष्ट नाट्य सादर केले असून सदरचे नाट्य गडचिरोली जिल्ह्याचे भूषण आहे.असे गौरवोद्गार डॉ.नामदेव उसेंडी यांनी नाट्य प्रसंगी काढले तर नाटकाचे प्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यापाड्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे; असे मत डॉ. देवराव होळी यांनी काढले.सदर नाट्यची निर्मिती संगीता टिपले कार्यशाळा संचालक व अनिरुद्ध वनकर कार्यशाळा समन्वयक यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जोरदार पावसाचा फटका; वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता.. – वैनगंगा नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानासह अन्य खरीप पिकांच्या स्थितीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.अशा परिस्थितीत काल रविवारी झालेला पाऊस पिकांसाठी...

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!