Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीएसडी ओ,तहसीलदार न्यायलयाच्या कचाट्यात -अवैध मुरुम,रेती प्रकरण भोवले…

एसडी ओ,तहसीलदार न्यायलयाच्या कचाट्यात -अवैध मुरुम,रेती प्रकरण भोवले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गडचिरोली-चामोर्शी-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कंत्राटदारांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध मुरुम,रेतीचा वापर करून शासनाची दिशाभूल केली.असा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यासंदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याअंतर्गत तब्बल दोन वर्षांच्या सुनावणीअंती खंडपीठाने गडचिरोली व चामोर्शी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन्ही तालुक्यांतील तहसीलदारांना जाब विचारित या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे.

गडचिरोली-चामोर्शी-आष्टी या राज्य महामार्गाच्या बांधकामात संबंधित कंत्राटदाराने या मार्गावरील अवैध मुरुमाचे उत्खनन करीत त्याचा बांधकामात वापर केला होता.यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचेकडे तक्रार करीत माहिती मागितली होती.मात्र त्यांनी अपुरी माहिती देत प्रकरण निकाली काढले. त्यामुळे ताटीकोंडावार यांनी गडचिरोली व चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी तसेच गडचिरोली,चामोर्शी तहसीलदारांवर शास्तीची कार्यवाही करण्यासंदर्भात १० जून २०२१ रोजी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.तब्बल दोन वर्षाच्या सुनावणीनंतर नागपूर खंडपीठाने संबंधित चारही अधिकाऱ्यांकडे शास्तीची कार्यवाही करिता खुलासा मागितला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हा खानिकर्म अधिकारी यांच्यावर प्रशासकीय पातळीवर कार्यकाही करण्याचे खंडपीठाच्या पत्रात नमूद केले.तब्बल दोन वर्षांनंतर माहिती अधिकार खंडपीठ नागपूर येथे झालेल्या सुनावणीत गडचिरोली,चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी,तहसीलदार हे प्रथमदर्शी दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतरही कुणावरही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या संबंधित चारही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी; अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!