Saturday, August 1, 2026
Homeदेसाईगंजअखेर प्रतीक्षा संपली; उद्याला तेंदूपत्ता बोनसची रक्कम येणार खात्यात.. - आमदार रामदास...

अखेर प्रतीक्षा संपली; उद्याला तेंदूपत्ता बोनसची रक्कम येणार खात्यात.. – आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांची मजुरी मिळून बराच कालावधी झाला आहे.अशातच गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज,कुरखेडा,आरमोरी,कोरची व इतर तालुक्यातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांच्या बोनसची रक्कम अद्यापही मिळालेली नसल्याने मजुरांद्वारे याबाबत वन विभागास वारंवार विचारणा करूनही बोनसची रक्कम जमा होण्याचे नावच घेत नव्हते.त्यामुळे सदरची बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांच्या आर्थिक अडचणींची माहिती देत बोनसची रक्कम तात्काळ जमा करण्याची मागणी केली.त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो प्रतिसाद देत मजुरांची तेंदूपत्ता बोनसची रक्कम उद्या बुधवार ८ जानेवारीला मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले असल्याने अखेर तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांच्या बोनसची प्रतीक्षा संपली असून आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!