Monday, September 21, 2026
Homeबीडअवैध वाळू उपसा प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह दोन तलाठी व एक शिपाई निलंबित...

अवैध वाळू उपसा प्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह दोन तलाठी व एक शिपाई निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया राज सुरू असल्याचे चित्र आहे.काही अपवाद वगळता बऱ्यापैकी अधिकारी,कर्मचारी संगनमत करून अवैध वाळू उपशावर आळा न घालता सर्व दारे खुली असल्याचे भासवित आहेत.अशातच एक ना एक दिवस प्रकरण अंगलट येणारच याची प्रचिती हल्ली बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे.बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असतांना वाळू माफियांकडून महसूलच्या पथकावर हल्ला केल्याचा खोटा गुन्हा महसूल कर्मचाऱ्यांनी दाखल केला होता.त्यानुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील वाळू घाटाची जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ५ जानेवारीला स्वतः पाहणी केली असता,तेथे मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या वाळू उत्खनन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.वाळूच्या उत्खननावर लक्ष ठेवणे ही मंडळ अधिकारी,तलाठी यांची प्राथमिक जबाबदारी असतांना त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यास अक्षम्य दिरंगाई केली.त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
दरम्यान,वाळू माफियांकडून याच महसूलच्या पथकावर हल्ला केल्याचा खोटा गुन्हा महसूल कर्मचाऱ्यांनी दाखल केला होता.या प्रकरणी चौकशी केली असता चौकशीत हा गुन्हा खोटा असल्याचं सिद्ध झाले.या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा जनसामान्यात मलीन झाली आहे.अधिकाऱ्यांच्या गैर वर्तनाचे गांभीर्य विचारात घेवून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या ४ कर्मचाऱ्यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे.जिल्हाधिकारी पाठक यांनी गेवराई तालुक्यातील रेवकीचे मंडळ अधिकारी पकाले बाळासाहेब हरिदास,रेवकी साजाचे तलाठी गोविंद प्रभाकर नरवटे,आगरनांदूरचे तलाठी गणेश तुळशीराम बावसकर आणि गेवराई तहसील कार्यालयातील शिपाई विठ्ठल रामराव सुतार असे तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.तसेच त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश काढले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!