Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीघरकुल योजनेत प्रशासनाचे दुटप्पी धोरणा; लाभार्थी चिंताग्रस्त..

घरकुल योजनेत प्रशासनाचे दुटप्पी धोरणा; लाभार्थी चिंताग्रस्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पंतप्रधान आवास योजना,यशवंतराव घरकुल योजना, रमाई आवास,मोदी आवास योजना अशा विविध योजना शासनाकडून राबविल्या जात आहेत.मात्र, घरकुल योजना राबवितांना प्रशासनाने दुटप्पी धोरणाचा अवलंब करीत ग्रामीण आणि शहरी असे दोन भाग पाडून घरकुल निधीत मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण केली आहे.त्यामुळे घरकुल कसे बांधावे,असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
ग्रामीण भागातील घरकूल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाकडून १ लाख ३० हजार आणि प्रोत्साहन अनुदान १८ हजार असे एकूण १ लाख ४८ हजार रुपयाचा निधी दिला जातो.शहरी भागात २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल निधीतील मोठी तफावत आणि भेदभाव दूर करण्याऐवजी उलट पीएम आवास
निधीमधील १० हजार रुपये कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने गरीब घरकूल लाभार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.नवीन धोरणांनुसार आता १ लाख ३८ हजार रुपयेच मिळणार असून तुटपुंज्या निधीत आपल्या घराचे स्वप्न कसे पूर्ण करायचे,असा प्रश्न निर्माण झाला आहे.परंतु अजूनपर्यंत ग्रामीण आणि शहरी घरकुल निधीच्या तफावतीबद्दल कुणीच आवाज उठवत नसल्याचे  दिसून येत आहे.गरीब जनता घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव असूनही चिंताग्रस्त आहेत.घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडले आहे. मात्र,शासनाने ग्रामीण आणि शहरी भागातील घरकुल निधीतील तफावत व निधी कपातीचा घेतलेला निर्णय घरकुल लाभार्थ्यांस कर्जबाजारी बनवणार आहे.त्यामुळे एकसारखा आणि घरकुलांच्या रकमेतही वाढ करण्याची मागणी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!