Saturday, July 11, 2026
Homeआरमोरीअखेर कारच्या अपघात प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल... - अपघातात देसाईगंज येथील युवकाचा...

अखेर कारच्या अपघात प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल… – अपघातात देसाईगंज येथील युवकाचा झाला होता मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-पाच दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्याच्या चुरमुरा-किटाळी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक  होऊन देसाईगंज येथील २४ वर्षीय युवक शिफान खान इलिायास पठाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता; तर आरमोरी शहरातील २२ वर्षीय शेखर संजय पिंपळकर सह २६ वर्षीय महेश सुरेश मुरवतकर हे दोघेही जखमी झाले होते.त्यानुसार काल,शनिवारी २१ डिसेंबरला आरमोरी पोलिस ठाण्यात याबाबत शहाबुद्दीन जहीर उद्दीन पठाण यांनी तक्रार दाखल केली.त्यानुसार २३ वर्षीय ट्रकचालक प्रदीप राजेश बर्मन रा.जोबी,ता.मानपूर,मध्य प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आरमोरी पोलिसांनी दिली.
माहितीनुसार,चुरमुरा-किटाळी मार्गावर ट्रकचालक प्रदीप बर्मन याने एमएमच-४०सीएम-४४८५ या क्रमांकाचा ट्रक सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होईल,अशा स्थितीत उभा करून ठेवला होता.त्यातच गडचिरोली येथे काही कामानिमित्त गेलेले शिफान खान इलिायास पठाण,शेखर पिंपळकर,महेश मुरवतकर हे तिघेही एमएच-३१ एफए-४५१३ क्रमांकाच्या कारने गडचिरोलीतील कामे आटोपून गावाकडे परत येत होते.अशातच मंगळवारी १७ डिसेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाइटमुळे डोळे दिपल्याने कारची उभ्या ट्रकला जोरदार धडक बसली. यात कारचालक शिफान खान इलियास पठाण याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता,तर शेखर पिंपळकर व महेश मुरवतकर दोघेही जखमी झाले होते.त्यानुसार आरमोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ट्रकचालक प्रदीप बर्मन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे आरमोरी पोलिसांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!