Wednesday, July 22, 2026
Homeचंद्रपूरअंगातील भूत काढून देण्यासह शेतातील गुप्तधनाचे आमिष दाखवून अंगणवाडी सेविकेची फसवणूक..

अंगातील भूत काढून देण्यासह शेतातील गुप्तधनाचे आमिष दाखवून अंगणवाडी सेविकेची फसवणूक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील वाघेडा येथील अंगणवाडी सेविकेची चार भामट्यांनी तब्बल ७ लाख ११ हजारांनी फसवणूक केल्याची घटना पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.ज्योत्सना अनिल मेश्राम वय ३७ वर्षे रा.वाघेडा असे फसवणूक झालेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे.
माहितीनुसार,अंगणवाडी सेविका व तिची दोन मुले एकत्र राहतात.पतीने सोडल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ज्योत्सना मेश्राम यांच्यावर येऊन ठेपली आहे.त्यातच त्यांनी प्रकृती बरोबर राहत नसल्याने कसे-बसे संसाराचा गाडा हाकत आहेत.अशातच १५ जानेवारी २०२४ रोजी दुपारच्या सुमारास वाघेडा येथे २५ ते ४० वयोगटातील दोघे जण भिक्षा मागण्यासाठी गावात गेले होते.तेव्हा जोत्सना त्यांना भेटली.त्यांनी तिला तिच्यात भूत संचारल्याचे सांगून तिच्या शेतात व घरात गुप्तधन असल्याचे बतावणी केली.भूत व गुप्तधन पूजा करून काढून देऊ.पण याची वाच्यता केल्यास मुलगा मृत्यू पावेल,अशी भीती दाखविली.ज्योत्स्नाने त्यांनी जे सांगितले ते केले. यासाठी त्यांनी ७ लाख रूपयांची मागणी केली.
जोत्सनाने बचत गटातुन ४ लाख ४५ हजार रूपये काढले.तसेच एका महिलेकडून १२ ग्रॅमची सोन्याची चैन घेऊन नेरी येथील पतसंस्थेमधून त्यावर ७० हजार रूपये काढले आणि जमा झालेले पैसे त्या भामट्यांना द्यायचे असल्याने मोबाइलद्वारे त्यांना माहिती दिली. २९ जानेवारी २०२४ ला रात्री आठच्या सुमारास ते चार भामटे आले.त्यांनी त्याच रात्री गुप्तधन काढण्याचे आमिष दाखविल्याने सदर महिला,तिची आई,मामाचा मुलगा यांच्यासोबत मोटारसायकलने शेतात गेले. त्यांच्या सोबत चार भामटे होते.शेतात गेल्यानंतर महिलेने जमा केलेले व तिच्याजवळील असे एकूण ७ लाख रूपये त्या भामट्यांनी घेतले.त्यांनतर गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून काही तरी भस्म जाळले. एक खड्डा खोदला.त्यामध्ये लिंबू,दही,दिवा लावून त्यातून मंत्राच्या सहाय्याने विद्या केल्याचे भासविले. मात्र,त्या खड्यात काहीही निघाले नाही.त्या रात्री काहीही न निघाल्याने त्या भामट्यांनी पुन्हा दुसरे भस्म घेवुन येत असल्याचे सांगून निघून गेले.दोन-तीन दिवस होऊनही ते न आल्याने त्या महिलेने त्यांना फोन केला.परंतु,त्यांचा फोन लागत नव्हता.तो बंद होता.त्यामुळे जोत्सनाला संशय आला. मुलाच्या मृत्यूची सतत भीती दाखवून गुप्तधनाचे आमिष दाखवून, तसेच अंगातील भूत काढून देण्याची बतावणी करून ७ लाख ११ हजाराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वर्षभरानंतर काल मंगळवारी १८ फेब्रुवारीला अंगणवाडी सेविका ज्योस्नानाने चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.चिमूर पोलिसांनी या प्रकरणी परमेश्वर उर्फ देवा किसाराम एकनाथ कळमेश्वर याला अटक केली आहे.मात्र,यातील तिघेजण अद्यापही फरार असल्याने चिमूर पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!