Thursday, June 25, 2026
Homeचंद्रपूरअंगणात शौचास बसलेल्या चार वर्षीय मुलाला बिबट्याने नेले उचलून- एक किलोमीटर अंतरावर सापडला मृतदेह-...

अंगणात शौचास बसलेल्या चार वर्षीय मुलाला बिबट्याने नेले उचलून- एक किलोमीटर अंतरावर सापडला मृतदेह- चंद्रपूर जिल्ह्यातील घटना 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील बोरमाळा येथे काल २९ मार्च रोजी बुधवारी सायंकाळी हृदयद्रावक घटना घडली असून अंगणात शौचास बसलेल्या एका चार वर्षीय मुलाला बिबट्याने आपल्या जबड्यात उचलून नेत ठार केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

हल्ली उन्हाळा सुरू झाल्याने पाण्यासाठी भटकंती करीत जंगलातील प्राणी गावाकडे येऊन मानवी संघर्षात वाढ होण्याची दाट शक्यता बळावली आहे.अशातच काल बुधवारी घरासमोरील अंगणात शौचास बसलेल्या मुलाला बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर उचलून नेले.आईच्या डोळ्यादेखत ही घटना घडली.बिबट्या मुलाला नेत असल्‍याचे पाहून आईने हंबरडा फोडला.यावेळी आजूबाजूचे नागरीक गोळा झाले.परंतु, मुलाला वाचविता आले नाही. 

सावली तालुक्यातील बोरमाळा येथे काल बुधवारी २९ मार्च रोजी संध्याकाळी ही घटना घडली.हर्षद कारमेंगे असे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.आईच्या डोळ्या देखत घटना घडल्याने एकच टाहो फोडला.गावातील नागरिकांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केला मात्र काल थांगपत्त लागला नाही.आज सकाळी घरापासून एक किलोमीटर अंतरावर एका शेतात त्याचा मृतदेह सापडला.सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई वन विभागातर्फे करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!