- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील मास्तर कॉलनीमध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने स्वतः च्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार दिनांक-१३ नोव्हेंबरला सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.मनीष ऊर्फ मुन्ना शंकर खोब्रागडे वय ३८ वर्षे, रा.वैरागड,ता.आरमोरी,असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील मास्तर कॉलनीमध्ये मनीष खोब्रागडे कुटुंबीयांसह वास्तव्यास होता.त्यातच मनीष हा काल,मंगळवारी १२ नोव्हेंबरच्या रात्री जेवण करून घरीच झोपला होता.त्यानंतर आज सकाळी कुटुंबीय झोपेतून जागे होऊन मनीष याच्या खोलीमध्ये गेले.खोलीमध्ये बघितले असता,तो आढळून आला नाही. त्यानंतर घरच्यांनी तळ मजल्यावरील खोलीत जाऊन बघितले असता,त्यांना मनीष हा तळ मजल्यावरील खोलीच्या आड्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.घरच्यांनी लगेच याबाबत आरमोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा करून मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे शविच्छेदनासाठी पाठविले.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -