Wednesday, June 3, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे यांच्या "महापूजा" या महानाट्यास साहित्य विहार संस्थेचा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या “महापूजा” या महानाट्यास साहित्य विहार संस्थेचा उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार २०२४ जाहीर… – संत्रा नगरीत झाडीपट्टीच्या नाटकाचा सन्मान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्राची उपराजधानी व संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा घेण्यात येते व मराठी साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मीतीसाठी ‘साहित्य विहार उत्कृष्ट वांड्.मय  पुरस्काराने’ पुरस्कृत करण्यात येते व विजेत्या २५ साहित्यिकांना नामवंत साहित्यिकांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या  पुरस्काराकरीता नाट्यवांड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “महापूजा ” या नाटकास नाट्यलेखनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे साहित्य विहार संस्थेचे सचिव मंदा खंडारे व अध्यक्षा आशाताई पांडे यांनी पत्रकाद्वारे कळविले असून येत्या ३० नोव्हेंबरला दुपारी २ ते ५ या वेळात बाबुराव धनवटे सभागृह, वोक्हार्ट हॉस्पिटल,शंकर नगर नागपूर येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रतिथयश शिक्षणतज्ञ डॉ.विनायक देशपांडे आणि विदर्भ साहित्य संघ,नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे हस्ते तसेच ज्ञानयोगी सन्मानाचे मानकरी डॉ.म.रा.जोशी व साहित्य विहारच्या अध्यक्ष ज्येष्ठ बहुभाषिक साहित्यिक आशा पांडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.या  पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह,सन्मान वस्त्र,सन्मानपत्र व ग्रंथभेट असे आहे.
‘महापूजा’ हे सन २००२ ते २०१० या कालावधीत संपूर्ण झाडीपट्टीतील गाजलेले महानाट्य असून ५१ कलावंत आणि १५ तंत्रज्ञांनी या नाटकात काम केले आहे.झाडीपट्टीत या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत.विशेष म्हणजे नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके”  व “धरती आबा क्रांतीसुर्य-बिरसा मुंडा” या दोन नाटकांना विविध स्तरांवर नाट्यलेखनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.’महापूजा’ या महानाट्यास मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,डॉ. राजकुमार मुसणे,डॉ.दिपक चौधरी,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!