Wednesday, June 3, 2026
Homeभंडारादिवसाढवळ्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवीत गायीला केले ठार...

दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवीत गायीला केले ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जंगलव्याप्त परिसरात चराईसाठी सोडलेल्या कळपातील एका आठ महिन्यांच्या गर्भार गायीवर दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवीत जागीच ठार केले असल्याची घटना लाखनी तालुक्यातील मांगली (बांध) शिवारात किटाडी बीट क्रमांक-२ येथे मंगळवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.यात पशुपालकाचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करून संरक्षण द्यावे;अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अमरपाल श्यामराव ठवरे रा.किटाडी असे  नुकसानग्रस्त पशुपालक शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ठवरे हे पशुपालन व्यवसाय करतात.त्यांनी किटाडी नजीकच्या मांगली (बांध) शिवारात असलेल्या आपल्या शेत शिवारालगतच्या जंगल परिसरात जनावरांचा कळप चराईसाठी मोकाट सोडला होता.जनावरे हिरवळीवर चरत असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने कळपातील एका गायीवर हल्ला केला.त्यावेळी पशुपालक (शेतकरी) अमर ठवरे यांनी मोठ्या हिमतीने हातातील काठीने वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता,त्यांच्यावर वाघ चवताळला.ते घाबरून काही अंतरावर दूर पळून गेले.
घाबरलेल्या स्थितीत त्यांनी भ्रमणध्वनीवरून गावकऱ्यांना माहिती दिली.त्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक धावून आले व आरडाओरड करून वाघाला जंगलात हुसकावून लावले.मात्र,तोपर्यंत गाय जागीच ठार झाली होती. घटनेची माहिती काल,बुधवारी वनविभागाला देण्यात आली.यानंतर पंचनामा करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!