Monday, April 27, 2026
Homeभंडारा३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली.सदरची घटना लाखांदूर तालुक्याच्या भागडी गावात घडली असून माधुरी तुळसीदास अंबादे वय ३० वर्षे,रा.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.तर  गौरव अंबादे रा.ब्रम्हपुरी असे संशयित आरोपीचे नाव आहे.
ब्रम्हपुरी येथील माधुरी अंबादे,त्यांची मुलगी जानवी व  गौरव अंबादे हे तिघेही काल,रविवार २६ एप्रिल रोजी लाखनी तालुक्याच्या पालांदूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते.तेथील विवाह आटोपून गावाकडे येण्यासाठी निघाले असता उशीर झाल्याने तिघांनीही रात्री लाखांदूर तालुक्याच्या भागडी येथील नातेवाईक नाजुका युवराज गणवीर यांच्याकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.रात्री सर्वांनी जेवण केले आणि झोपी गेले.अश्यातच आज सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास माधुरी यांची मुलगी जानवी हिच्या जोरात ओरडण्याचा आवाज आला. आवाजामुळे घरमालक नाजुका गणवीर यांना जाग आली.त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, संशयित आरोपी गौरव अंबादे हा घाईघाईने त्याच्या दुचाकीवरून पळून जात असल्याचे त्यांना दिसले.संशय आल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता माधुरी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या.आरोपीने माधुरी यांचे तोंड उशीने दाबून पाय स्कार्फने बांधले व धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला.शरीरावर इतर ठिकाणीही गंभीर जखमा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.गावात माहिती होताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.त्यानंतर,घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांनी देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.दरम्यान,संशयित आरोपी गौरव अंबादे याच्यावर लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी फरार झाल्याने पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा...

रखरखत्या उन्हात लग्नसमारंभासाठी प्रवास; बसमध्येच सोडला प्राण.. – आज उष्णतेच्या लाटेचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या स्थितीत नागपूरसह विदर्भाचे तापमान वाढतच आहे.एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असून अंगाची लाहीलाही होत आहे.एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे,तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!