उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- ब्रम्हपुरी येथील एका २४ वर्षीय तरुणीने देसाईगंज जवळील वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना मंगळवारी,दिनांक- १६ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.ईशा घनश्याम बिंजवे वय २४ वर्षे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.आत्महत्या केलेली तरुणीनी ब्रम्हपुरी येथील निवासी डॉक्टर घनश्याम बिंजवे यांची मुलगी आहे.
सविस्तर वृत्त असे की,तरुणी ही दुचाकी ॲक्टिवा क्रमांक-एमएच-४९,झेड- ४१७६ ने देसाईगंज येथील वैनगंगा नदीच्या पुलावर सायंकाळच्या सुमारास आली.पुलावर दुचाकी उभी केली.त्या गाडीवर आपल्या चप्पल ठेवल्या.त्यानंतर नदीच्या पुलावरून उडी घेतली.नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली.मात्र,आत्महत्या करण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली.यावेळी मात्र पाणी अधिक असल्याने ती वर आलीच नाही.या घटनेचा पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या काहींनी व्हिडीओ काढला.मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही.घटनेनंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नव्हता.काल,बुधवारी सायंकाळी वैनगंगा नदीच्या नीरज गावाजवळील पात्रामध्ये तिचा मृतदेह आढळून आला.आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.
अनेकजण व्हिडिओ,फोटो काढण्यात व्यस्त👇
वैनगंगा नदीच्या पुलावर ईशाने आपली दुचाकी उभी केली.त्यानंतर तिने आत्महत्या केली.या घटनेचा अनेकांनी व्हिडीओ,तर काहींनी फोटो काढले.मात्र, तिला वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही.पहिल्या प्रयत्नानंतर नागरिकांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता,असे नागरिकांमधून बोलले जात आहे.