- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस आली.तनुश्री उर्फ तनु रामेश्वर देव्हाहे असे मृत तरुणीचे नाव असून माहितीनुसार,तनुश्रीचे वडील रामेश्वर हे दूध विक्रीचे काम करतात.काल रविवारी दूध घेऊन ते चिचोली गावात गेले होते.घरी परत आले असता,घरातील लाकडी मयालीला लटकलेल्या अवस्थेत तनुश्री आढळली.तिला खाली उतरवून गावातीलच एका डॉक्टरकडे नेण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.याबाबतची माहिती आंधळगाव पोलिसांना देण्यात आली.पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.अशातच तनुश्रीने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.पुढील तपास पोलिस हवालदार गणेश मते करीत आहेत.
- Advertisement -