- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका टॉवरवर १४ वर्षीय तरुणी व २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी २ मार्चला ब्रम्हपुरी तालुक्याच्या उचली गाव परिसरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर वय १४ वर्षे,रा.चांदली व रोहित रमेश लिंगायत वय २५ वर्षे,रा.उचली,ता.ब्रम्हपुरी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
माहितीनुसार,गायत्री व रोहित यांचे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.प्रेम संबंध असतांनाच काल रविवारी रोहितचे गाव असलेल्या उचली येथील टॉवरवर दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शंका-कुशंकेला वाचा फुटली आहे.अशातच घटनास्थळावर दुचाकी आढळून आल्याने गळफास लावण्यासाठी त्यांनी दुचाकीचा आधार घेतला असावा, असा कयास बांधला जात आहे.त्यामुळे दोघांनीही प्रेम संबंधातून आत्महत्या केली की,कोणी मारून फासावर लटकवले? हे अनुत्तरित असले तरीही पोलीस तपासात उघड होणार आहे.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
- Advertisement -