उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्पाबाबत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात सूरजागडमधील बेकायदा खाणकामाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला.आता याच मुद्दयावर प्रकृती फाऊंडेशनच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल – करण्यात आली आहे.राज्य सरकारसोबत झालेल्या कराराचे उल्लंघन होत असून प्रशासनाला योग्य आदेश देण्याची विनंती याचिकेतून करण्याती आली होती. न्यायालयाने हे प्रकरण ऐकण्यास नकार दिला.योग्य • प्रक्रियेचा अलवंब करीत याचिकाकर्त्याने प्रथम संबंधित प्राधिकरणाकडे जावे.त्यानी विनंती मान्य न केल्यास याचिका करता येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
संबंधित विभागाकडे प्रश्न मांडूनही हा प्रश्न सुटला नाही, तर याचिकाकर्त्याला पुढील पाऊल उचलण्याची मुभा असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने हा अर्ज संबंधित विभागाकडे दाखल झाल्यास त्या अर्जावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. हिवाळी अधिवेशनातही विधानसभेत या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान आमदारांकडून आक्षेप घेण्यात आला होता.बेशिस्त उत्खननाकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.