Monday, August 24, 2026
Homeनागपूरअनियंत्रित ट्रक पलटी; तिघांचा मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

अनियंत्रित ट्रक पलटी; तिघांचा मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर आणि काटोल मार्गावरील मोवाड गावाकडे विटा भरून जाणाऱ्या एका आयशर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित ट्रक पलटी होऊन तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला,तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,मंगळवार १९ मे रोजी सावनेर तालुक्याच्या ईसापूर(झिल्पा) गावाजवळ घडली.लीलाधर विष्णूजी वालूलकर वय ४० वर्षे,अजित निलकंठ भलावी वय ४० वर्षे व संजय सुदामजी कनेरे वय ४४ वर्षे अशी मृतकांची नावे असून हेमराज लक्ष्मण कन्हेरे आणि सुभाष जयराम धुर्वे आणि राजेंद्र राजगुरू अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सर्वजण नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्याच्या मोवाड गावचे रहिवासी आहेत.
आज मंगळवारी दुपारच्या सुमारास एमएच २३ एयू ३२३५ क्रमांकाच्या आयशर ट्रकमध्ये विटाभरून सहा मजूर व ट्रक चालक मोवाड गावाकडे जाण्यासाठी निघाले होते.उन्हाची तीव्रता लक्षात घेता मजूर केबिनमध्ये झोपलेले होते.दरम्यान,ईसापूर(झिल्पा) गावाजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला.यात ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला,तर तिघेजण गंभीर जखमी झाले.अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.यावेळी ट्रक चालक तथा मालक प्रवीण उर्फ गोलू बले रा.मोवाड हा घटनास्थळावरून फरार झाला. काटोल पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१,१२५(अ),१०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ठाणेदार रणजीत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!