- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने धडकेत बिबट्या गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत पावल्याची घटना सावनेर तालुक्याच्या पांढुर्णा-सावनेर महामार्गावरील पिपळा(भदी)शिवारात काल मंगळवारच्या रात्री सव्वा वाजताच्या सुमारास घडली.
सावनेर तालुक्यातील पिपळा(भदी)शिवारातील भोपाळ-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या पांढुर्णा-सावनेर लेनवर हा बिबट रस्ता ओलांडत होता.रस्ता ओलांडत असतांनाच पांढुर्णाहून सावनेरच्या दिशेने वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरात धडक दिली आणि वाहन न थांबता निघून गेले.या धडकेमुळे बिबट गंभीर जखमी झाला.या मार्गाने जाणाऱ्यांपैकी एकाने या घटनेची माहिती हितेश बन्सोड यांना दिली.त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खर्डे यांना कळविले.सागर खर्डे यांच्याकडून माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी विजय गंगावणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला.मृत बिबट नर असून,त्याचे वय अंदाजे ५ वर्षे आहे.त्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून आज,बुधवार १ जुलै रोजी बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याची शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावली जाणार आहे.
- Advertisement -

