Wednesday, August 12, 2026
Homeचंद्रपूरगार्डनच्या हिरवळीची जागा बनली प्रेमीयुगलांचा अड्डा...! - एपीजे अब्दुल कलाम गार्डन मधील...

गार्डनच्या हिरवळीची जागा बनली प्रेमीयुगलांचा अड्डा…! – एपीजे अब्दुल कलाम गार्डन मधील प्रकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील विसापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एपीजे अब्दुल कलाम गार्डन आहे.याठिकाणी सध्या प्रेमीयुगुलांची वर्दळ वाढल्याने हे ठिकाण लव्हर्स पॉइंट म्हणून ओळखले जात आहे. तसेच एपीजे कलाम गार्डनमधील हिरवळीच्या मोकळ्या जागेतही प्रेमीयुगुलांनीच ठिय्या मांडल्याने हे ठिकाण सध्या प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे.

काही वर्षांपूर्वी विसापूर वळणावर वृक्षारोपण करण्यात आले. येथील झाडे आता मोठी झाडे झाली आहेत. त्यामुळे येथे सुशोभीकरणासोबतच मोठ्या प्रमाणातवर हिरवळ असल्याने आल्हाददायी वातावरण असते. त्यामुळे अनेकवेळा दुपारी दुचाकीवरून जाणारी अनेक कुटुंबे काही वेळ येथे विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला निघतात.मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे काही तरुण- तरुणींची घोळका पाहायला मिळत आहेत.या लोकांचे कृत्य पाहून अनेकवेळा इतर नागरिकांना लाजीरवाणे झाल्यासारखे वाटते.अनेकदा तर अश्लील चाळे करतानाही प्रेमीयुगुल दिसून येतात.येथे वृक्षारोपण करून परिसराचे सुशोभीकरण करून शाळकरी मुलांकरिता सहलीसाठी एक उत्तम स्थळ येथे व्हावे, हा मुख्य उद्देश होता. 

मात्र,सध्या येथे वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. अंधार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुचाकीवर बसलेले प्रेमीयुगुल कधी- कधी एकाच दुचाकीवर एकमेकांचा हात धरून बसलेले दिसतात.अशा परिस्थितीत येथे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!