Sunday, August 30, 2026
Homeनागपूर२४ वर्षीय तरुण आणि १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याच्या तयारीत असतांनाच...

२४ वर्षीय तरुण आणि १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याच्या तयारीत असतांनाच धडकले पथक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार अल्पवयीन विवाह हा कायदेशीर गुन्हा आहे.त्याचे गंभीर परिणाम होत असतांनाही बालविवाहाच्या तयारीत असलेल्या मंडपात चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून जिल्हा बाल संरक्षण पथकाने एंट्री करून बालविवाह रोखल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील वडधामना गावात उघडकीस आली.विशेष म्हणजे,१५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही गोंदिया जिल्ह्यातील असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील २४ वर्षीय युवकासोबत लावण्याची तयारी सुरू होती.सदरची माहिती मिळताच नागपूर जिल्हा बाल संरक्षण पथकाने संबंधित ठिकाणी भेट दिली. त्यानंतर,पथकाने कुटुंबीयांशी संवाद साधून समुपदेशन केले. समुपदेशनानंतर कुटुंबीयांनी विवाह स्थगित करण्यास सहमती दर्शवली.सदरची कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण,चाईल्ड हेल्पलाईन प्रतिनिधी व सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!