- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट यूजी-२०२६'(NEET-UG)ची परीक्षा नुकतीच ३ मे २०२६ रोजी देशभरातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमधील ५ हजार ४०० हून अधिक केंद्रांवर २२ लाखांहून अधिकच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.मात्र,परीक्षेतील पेपरफुटीच्या संशयावरून १२ मे २०२६ रोजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.त्यानुसार,सध्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)अत्यंत वेगाने करत असून याप्रकरणी आतापर्यंत सात जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सीबीआयने पाच मुख्य आरोपींना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर केले.यामध्ये राजस्थानचे मंगीलाल बिनवाल, दिनेश बिनवाल आणि विकास बिनवाल,तर हरियाणातील गुरुग्रामचा यश यादव आणि महाराष्ट्रातील नाशिकचा शुभम खैरनार यांचा समावेश आहे.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने या सर्व पाचही आरोपींना सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रातही सापडले असून,सीबीआयच्या पथकाने पुण्यातून मनीषा वाघमारे या ब्युटिशियनला,तर नाशिकमधून धनंजय लोखंडे यालाही अटक केली आहे. अश्यातच आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने(NTA) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट यूजी-२०२६’ परीक्षेच्या नव्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.आता ही पुर्नपरीक्षा येत्या,रविवार २१ जून २०२६ रोजी पार पडणार आहे.नव्याने होणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि त्यांच्यावर मानसिक किंवा आर्थिक ताण पडू नये, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांनी जाहीर केल्यानुसार,या पुर्नपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून एक रुपयाही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. उलट,आधी भरलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहे.त्याचबरोबर,नव्याने अर्ज करण्याची गरज राहणार नाही,तर जुनेच अर्ज ग्राह्य धरले जातील.
याव्यतिरिक्त,विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रासाठी नव्याने शहराची निवड करण्याची विशेष मुभा दिली जाईल.विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षेच्या वेळेतही १५ मिनिटांची वाढ करण्यात आली असून,आता ही परीक्षा दुपारी २ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत चालेल.या परीक्षेची नवीन प्रवेशपत्रे १४ जूनपर्यंत अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
- Advertisement -

