उद्रेक न्युज वृत्त
नितेश केराम/ कोरपना ता.प्र.
चंद्रपूर (कोरपना):- कोरपना तालुक्यातील मौजा- कन्हाळगाव येथे हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन हनुमान देवस्थान कन्हाळगाव यांच्या वतीने करण्यात आले. सप्ताहासाठी परमपूज्य बालयोगी आचार्य भागवत स्वामी गजेंद्र महाराज,लहरी बाबा संस्थान श्रीक्षेत्र मदापूरे जिल्हा अकोला व त्यांचे सहकारी स्वामी नारायण दृद महाराज यांचे प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सांगितले की,सुदृढ समाज निर्मितीसाठी संत,समाज आणि प्रबोधनकार यांची आवश्यकता असते.आजच्या समाजातील संयुक्त कुटुंब पद्धतीला तडे पडत असल्याने मानवी द्वेष व आपसातील मतभेद वाढीस लागत आहे.मानवी जीवन कसे जगावे, संहबंध कसे जपावे इतर बाबींवर मनोगत व्यक्त केले.