उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- “साहित्य माझे जीवन समूह महाराष्ट्र राज्य” या समूहाची स्थापना दि.३० जुलै २०२२ रोजी झाली होती.या समूहाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दुसरा वर्धापनदिनानिमित्त सलग दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारावर,वेगवेगळ्या विषयावर ऑनलाईन काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे आयोजन समूहाचे संस्थापक अजय राऊत, संस्थापिका हर्षा भुरे भंडारा,संचालिका शुभांगी डांगरे यांनी केले.तर दहा स्पर्धेचे परीक्षण निलांबरी जाधव(केरळ),वैशाली राऊत(नागपूर),अजय राऊत(चंद्रपूर),शुभांगी डांगरे (नागपूर),पांडुरंग आलीम(रत्नागिरी),रुपाली निखारे(नागपूर),पद्माकर वाघरूळकर(छ. सं.नगर),धनश्री म्हेत्रस (पुणे), पुष्पलता येवलकर(नाशिक),हर्षा भुरे(भंडारा) यांनी केला होता.या स्पर्धेत महाराष्टातून ११२ साहित्यिक सहभागी होते.
या दहा स्पर्धेतून दहा गुण मिळवून हर्षा भुरे(भंडारा)यांनी पहिली बाजी मारली.तर रवींद्र गिमोनकर यांनी आठ स्पर्धेत क्रमांक मिळविले.पांडुरंग आलीम यांनी आठ गुण मिळविले.निलांबरी जाधव यांनी आठ गुण मिळविले तर शुभांगी डांगरे यांनी सात गुण मिळविले.डॉ.रेखा पौडवाल,वैशाली राऊत, विनायक पाटील,जयद्रथ आखाडे,जमालोद्दीन शेख यांनीही सहा गुण मिळविले.हर्षा भुरे यांनी दहा पैकी दहा गुण मिळवल्याबद्दल समूहतर्फे यांना साहित्य सम्राज्ञी पुरस्कार देण्यात येणार आहे.तर ज्यांनी दहा पैकी आठ ते सहा गुण मिळविले त्यांना ‘काव्य रत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे.समूहातर्फे पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

