Saturday, September 5, 2026
Homeचंद्रपूरसाहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व त्याच्याकडून चोरी केलेला २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.ससुर ऊर्फ कोलकाता साहजन मंडल वय ३९ वर्षे, रा.फुटनगर,चंद्रपूर,मूळ रा.पश्चिम बंगाल असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.चोरीची ही घटना चंद्रपूर शहराच्या तुकूम परिसरातील छत्रपतीनगर येथे नुकतीच घडली होती.
अज्ञात चोरट्याने तुकूम परिसरातील छत्रपतीनगर येथे
नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरातून २८ ऑगस्टच्या रात्री कटर मशीन,ग्राइंडर मशीन व अन्य साहित्य लंपास केले होते.याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अप.क्र.१०६०/२०२६,भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला व गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ससुर ऊर्फ कोलकाता साहजन मंडल यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.दरम्यान,पोलिसांनी आरोपीकडून कटर मशीन,टायटन मशीन,विविध कंपन्यांची ड्रिल मशीन,रोटर मशीन,ग्राइंडर मशीन तसेच दरवाजाचे कब्जे व अन्य साहित्य असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी त्याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदर कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे,पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले,पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार सतीश अवथरे, लालू यादव,इमरान खान,हिरालाल गुप्ता,संदीप कांबळी, पोलीस अंमलदार शशांक बदामवार,किशोर वाकाटे तसेच सायबर सेल चंद्रपूरचे पोलीस हवालदार कार्तिक खनके यांच्यासह पथकाने कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!