- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत गणल्या जाणाऱ्या विसोरा गावात सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांनी भेट देत गावातील नागरिकांशी हितगुज करीत गावातील विविध समस्या जाणून घेतल्या व समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.
देसाईगंज तालुक्यातील वीसोरा गाव हे लोकसंख्येच्या मानाने मोठे तसेच धनवान व्यक्तींचे गाव म्हणून ओळखले जाते.अशातच गावात पाहिजे त्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने गावचा विकास अजूनही काही प्रमाणात खुंटलेला दिसून येतो.त्यामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे सामाजिक कार्यकर्ते खेमराज नेवारे यांनी गावातील समस्यांसंदर्भात सदिच्छा भेट देत नागरिकांशी हितगुज साधले असता, गावातील बर्डी-विसोरा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूस चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करणे आवश्यक आहे.आरोग्य सुविधांचा पुरेसा अभाव दिसून येतो.गावात शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्याने गावातील नागरिक,लहान बालके यांची गैरसोय होत आहे.गावामध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या असून स्त्रियांना प्रसूतीसाठी रात्री- बेरात्री कुरखेडा,देसाईगंजसह प्रसंगी गडचिरोलीला जावे लागत असते.वेळेवर रुग्णवाहिकेची सोय नसल्याने गावकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे.गावात मोठे व्यापारी,उद्योजक असून त्या मानाने गावात एकही राष्ट्रीयकृत बँक तसेच एटीएम ची सुविधा नाही; सदर गाव विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याने याकडे लक्ष घालून वरिष्ठ स्तरावर गाऱ्हाणे मांडून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खेमराज नेवारे यांनी प्रसंगी ग्रामस्थांना सांगितले.
- Advertisement -

