Tuesday, April 21, 2026
Homeचंद्रपूरसरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रातील मामला बीटाच्या कक्ष क्रमांक-३८४ मध्ये घडली.जगन महासिंग धुर्वे वय ५० वर्षे, रा.मामला,ता.जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
जगन धुर्वे हे जवळच्या जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेले असता दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानकपणे झडप घातली.मान व गळ्यावर गंभीर मार लागल्याने धुर्वे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला कळवले.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे व त्यांची चमू घटनास्थळावर दाखल झाली.या हल्ल्यानंतर,वन अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात गस्त वाढवली असून सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.प्रसंगी पीडितेच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देण्यात आली असून स्थानिकांनी वनक्षेत्रात जातांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!