Friday, October 16, 2026
Homeचंद्रपूरसख्ख्या मुलाने चोर बापाला दिले पकडुन; वाघाच्या अवयवांची चोरी प्रकरण..

सख्ख्या मुलाने चोर बापाला दिले पकडुन; वाघाच्या अवयवांची चोरी प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाथरी उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक-२९८ मध्ये सोमवार,२३ मार्च २०२६ रोजी वाघाच्या मृतदेहाबाबत वन विभागास तक्रार प्राप्त झाली.तक्रारीची तात्काळ दखल घेत वनअधिकाऱ्यांनी दुपारी सुमारे १२ वाजता घटनास्थळी पाहणी केली असता,वाघाच्या शरीराचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत आढळले,तर काही अवयव घटनास्थळावरून गायब असल्याचे निदर्शनास आले. प्रकरणी चंद्रपूर वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या नेतृत्वात तपास सुरू असतांनाच कहाणीमध्ये ट्विस्ट आला.चक्क पोटच्या मुलाने बापाच्या रोजच्या किटकीटीपायी पोलीस ठाणे गाठले आणि चोर बापाचा भांडाच फोडला.आरोपी सुरेश सोनकर याच्या मुलाने पाथरी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. लागलीच सदरची माहिती ही वन विभागास पोलिसांनी देताच प्रकरणाला वाचा फुटली. सुरेश सोनकर,दिवाकर सोनकर दोघेही रा.उसरपार चक,ता.सावली,जि.चंद्रपूर,गोंदियाचा शिशुपाल मेश्राम,तर गडचिरोली येथील विनोद गेडाम या चार आरोपींना वनकोठडी ठोठावण्यात आली आहे,तर आकाश दाजगाये,किशोर भोयर,बबलू शेंद्रे यांना संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी सुरू आहे.काल गुरुवारी आरोपींकडून वाघाचे दोन दात,एक नख,आठ मिशा आणि हाडे जप्त करण्यात आली असून सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक रामानुजन,विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे आरएफओ विनोद धुर्वे व त्यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!