Thursday, September 3, 2026
Homeभंडारावैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; गोसेखुर्द धरणाचे १५ दरवाजे खुले..

वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; गोसेखुर्द धरणाचे १५ दरवाजे खुले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात कुठे जोरदार पाऊस तर कुठे मध्यम तथा हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची उघडीप, त्याचबरोबर रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस हजेरी लावत आहे.अश्यातच काल शुक्रवारच्या रात्री भंडारा, गडचिरोली व इतर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.परिणामी,वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही वाढ करण्यात आली आहे.आज,शनिवार २७ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास गोसेखुर्द धरणाचे ९ दरवाजे अर्धा मीटरने सुरू करण्यात आले होते.तर  आता सायंकाळच्या सुमारास आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.त्यानुसार आता धरणाच्या १५ दरवाज्यातून अर्धा मीटरने पाण्याचा येवा सुरू करण्यात आला असून त्यातून ६६ हजार ५६८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.तर,भंडारा ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीला जोडणाऱ्या मार्गावरील सावरला पुलावर पावसाचे पाणी असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.तर भंडारा ते कारधा असे दोन मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुलावरून पाणी वाहत असतांना वाहन वा आवागमन करू नये,असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!