Friday, June 19, 2026
Homeचंद्रपूरवृद्धापकाळात आधार देण्याच्या कर्तव्यापासून पोबारा करणाऱ्या शिक्षकाला दणका…-वृध्द आईला द्यावा लागणार महिण्याकाठी...

वृद्धापकाळात आधार देण्याच्या कर्तव्यापासून पोबारा करणाऱ्या शिक्षकाला दणका…-वृध्द आईला द्यावा लागणार महिण्याकाठी ७ हजार रुपये निर्वाह भत्ता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-आई-वडील आणि आजी-आजोबांचा सांभाळ करणे हे मुला-बाळांचे व नातवंडांचे कर्तव्यच आहे.परंतु काही मुले-मुली व नातवंडे आपल्या जन्मदात्यांचे ऋण विसरतात.वृद्धापकाळात आधार देण्याच्या कर्तव्यापासून पोबारा करतात.हेच कृत्य एखादा शिक्षक करत असेल तर.? मन सुन्न करणाऱ्या अशाच एका घटनेत उपविभागीय अधिकारी स्नेहल राहाटे यांनी तात्काळ दखल घेत,निर्वाह कल्याण अधिनियम २००७ नुसार वृद्ध आईला निर्वाह भत्ता देण्याचा आदेश देऊन शिक्षक पुत्राला अद्दल घडविली आहे.विठ्ठलवाडा येथील लीलाबाई डोनुजी गणवीर यांचा मोठा मुलगा सिमोन हे शासकीय नोकरीत आहेत.ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार निर्वाह भत्ता मिळावा; यासाठी आई लिलाबाई यांनी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मुलगा सिमोन गणवीर यांच्याविरोधात १३ जून २०२४ रोजी अर्ज दाखल केला.शासकीय नोकरीत असुनही आई म्हणून सांभाळ करत नाही; असे नमूद करून वृद्ध लिलाबाईने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली.तपासात खात्री पटल्यानंतर शिक्षकपुत्र गणवीर यांनी वृद्ध आईला दरमहा ७ हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा; असा आदेश पारित केला.या विषयाची आता शिक्षक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्नेहल राहाटे,उपविभागीय अधिकारी,गोंडपिपरी👇

ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कलम ५ पोट कलम (१) नुसार निर्वाह भत्ता मिळण्यासंदर्भात सुमोनच्या आईने अर्ज दाखल केला होता.अर्जदाराला प्रतिमाह सात हजार रुपये भता देण्याचा आदेश ५ जुलै,२०२४ ला जारी केला.या आदेशाचे पालन न केल्यास एक महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे.आदेशाचे पालन करावे,अन्यथा पुढील कारवाई करू,शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे.

गोंडपिंपरी तालुक्यात यापूर्वी अशाच एका प्रकरणाबाबत मुलाने आई-वडिलांवर अन्याय केल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर लोकांमध्ये कायद्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.कायदा समजून घेत पीडितांनी न्यायासाठी एसडीओ कार्यालयात प्रकरण दाखल करताच त्यांना न्याय मिळाला होता.पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने हा विषय शहरात चर्चेत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!