Wednesday, September 23, 2026
Homeकोरचीकोरची येथे काँग्रेस नेते रामदास मसराम यांची रुग्ण सेवा…-१०४८ रुग्णांनी घेतला लाभ…

कोरची येथे काँग्रेस नेते रामदास मसराम यांची रुग्ण सेवा…-१०४८ रुग्णांनी घेतला लाभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरची(गडचिरोली):- गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी, बहुल,नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मोफत आरोग्याचा लाभ घेता यावा; याकरीता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम तसेच मित्र परिवार यांच्यातर्फे ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्यात मसराम यांनी आलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत रुग्ण सेवेचा लाभ दिला.यात १०४८ रुग्णांनी लाभ घतला असून ४२० रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.३१० रुग्णांची सामान्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली.६५ रुग्णांची बिएमडी मशिन द्वारे तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला.हृदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करून ४५ रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन तसेच ३५ मोतीबिंदु रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेची पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन केले व २० रुग्णांची इसिजी,१२० सोनोग्राफी तर १६ रुग्ण मुत्र खड्याचे तर ३३ रुग्ण स्त्रीरोग तपासण्यात आले .

शिबिराचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे महासचिव हकिमुद्दिन शेख यांनी केले.अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा हर्षलताताई भैसारे ह्या होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिबिराचे आयोजक काँग्रेस नेते रामदास मसराम,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापसिंग गजभिये, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सदरुद्दिन भामानी, पं.स.देसाईगंजचे माजी सभापती परसराम टिकले, ग्रामीण रुग्णालय कोरचीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. थूल,वैद्यकीय अधिकारी डॉ.राऊत,डॉ.विटणकर,डॉ. बर्डे,वसीम शेख,रामनाथ कोर्चा,नगरसेवक धरमसाय नैताम,महेश नरोटे,नांदळी ग्रामपंचायतचे सरपंच सरील मडावी,माजी सरपंच बाबुराव मडावी, बिहिटेकला ग्रा.पं.चे सरपंच किशोर नरोटे,रवी नंदेश्वर, तुलाराम मडावी,युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक हलामी, चतुर सिंद्राम,रुख्मन घाटघुमर,खुशाल मोहूर्ले आदी उपस्थित होते.

गोरगरिब नागरिकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये; यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर तसेच प्रयत्नशील असलेले शेतकरी आंदोलनाचे नेते रामदास मसराम यांनी कोरची येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी वाटप,नेत्र उपचार,मोफत चष्मे वाटप व सामान्य रोगांची तपासणी  शिबिराचे आयोजन केले होते.

सदर आरोग्य शिबिरास नागपूरच्या सुप्रसिद्ध  श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोलीचे तज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी त्याच प्रमाणे देसाईगंज ग्रामिण रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली.यशस्वीतेसाठी सागर वाढई,स्वप्निल मिसार,जितू चौधरी, उमाकांत दोनाडकर,रेशीम प्रधान,प्रमोद पत्रे,ताजुल उके,विपुल सहारे,मनीष मोटघरे, आकाश पेटकुले,रोशन कवासे, दुषांत वाटगुरे यांचेसह युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!