Tuesday, April 21, 2026
Homeदेसाईगंजविविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या देसाईगंज शहरातील महिलांचा सन्मान..

विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या देसाईगंज शहरातील महिलांचा सन्मान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने स्थानिक नगर परिषद सांस्कृतिक भवनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीर,शहीद कुटूंबांतील व्यक्ती,शहरातील प्रतिभावंत महिला तसेच महिला सफाई कर्मचारी यांचा शाल,श्रीफळ, वृक्षकुंडी, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले.
जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात  साजरा करुन,महिलांच्या सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान करतो.हा दिवस लिंग समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी लढा देण्याचे आणि हक्कांची जाणीव करून देण्याचे प्रतीक आहे.कामगार चळवळीतून सुरू झालेला हा दिवस महिलांच्या संघर्षाची आठवण करून देतो.त्यामुळे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या शहरातील महिलांचा सन्मान होणे आवश्यक असल्याने नगर परिषद देसाईगंज महिला व बालविकास समितीच्या वतीने त्यांचा सत्कार व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शहीद कुटूंबातील पुष्पा नानाजी कुमरे,नरेंद्र विठोबा भोयर, अनिता महादेवराव भोयर,जयश्री नानाजी नागोसे व महिला पदाधिकारी,शासकिय अधिकारी/कर्मचारी तसेच शहरातील प्रतिभावंत महिलांचा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह,वृक्षकुंडी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महिलांचे विविध सामाजिक विषयांवरील व मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लता सुंदरकर व सहअध्यक्ष म्हणून देसाईगंज नगर  परिषदेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी,प्रमुख अतिथी म्हणून सभापती स्वच्छता,वैद्यक व आरोग्य समिती चैतनदास विधाते,सभापती शिक्षण समिती बाळकृष्ण माडुरवार, सभापती नियोजन समिती पिंकू बावणे तर  सत्कारमुर्ती सभापती महिला बालकल्याण समिती भाविआ साधवानी,तहसिलदार प्रिती डूडूलकर, पोलिस उपनिरीक्षक कोमल माने,प्रियंका बावणे, वैद्यकिय अधिकारी डॉ.विद्या गेडाम,अधिवक्ता ॲड. जुईली मेश्राम,डॉ.मिनाक्षी बन्सोड,माजी नगराध्यक्षा शालु दंडवते,नगरसेविका राधीका पत्रे,मंदा समर्थ, पल्लवी मेंढे,पार्वता बेदरे,गुरमितकौर चावला नगरसेवीका,आशा दहिवले,लता मुळे,फैमीदा पठाण,भारती कुथे नगरसेवीका तर प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय देसाईगंजचे डॉ.नरेंद्र आरेकर,नगरसेवक राहूल सतवानी,मो.युनुस शेख आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे तर सुत्रसंचालन लता मुळे व योगिता निंबार्ते यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता समुदाय संघटक अरुण मोटघरे,अस्तित्व शहर स्तर संघाच्या सचिव कल्पना वासनिक,समुदाय संसाधन  आरती ठाकरे,वैष्णवी आकरे,शालू राऊत,दिपाली कुथे,नरगिस पठाण,रिझवाना पठाण,माधुरी चांदेवार, सुजाता भिलकर,नगर परिषदेचे अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खेडेगावच्या जंगलात जुगाराचा डाव; अड्ड्यावर पोलीसांची धाड.. – तब्बल २२ आरोपींना अटक करून ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील खेडेगावच्या जंगलात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री ते आज मंगळवारी पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन कुरखेडा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!