Thursday, June 25, 2026
Homeभंडारावाघाने शेतकरी महिलेच्या नरडीचा घेतला घोट.. - घटनेनंतर वाघ घटनास्थळाजवळच ठाण मांडून......

वाघाने शेतकरी महिलेच्या नरडीचा घेतला घोट.. – घटनेनंतर वाघ घटनास्थळाजवळच ठाण मांडून… – संतप्त गावकऱ्यांची वनविभागाच्या वाहनावर दगडफेक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-वन्य प्राण्यांचे हल्ले थांबता-थांबेना,असे सर्वत्र झाले आहे.पशुंसह मानवावर हल्ले करून जिवानिशी ठार मारणाऱ्या वन्य प्राण्यांवरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत.अन्यथा हे असेच सुरू राहणार की काय? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.एका गोर-गरीब शेतकरी महिलेस शेतशिवारात काम करीत असताना दडी मारून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून शेतकरी महिलेच्या नरडीचा घोट घेऊन तिला ठार केल्याची खळबळजनक घटना काल,बुधवारी २९ जानेवारीच्या सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्याच्या कोका अभयारण्यालगत वसलेल्या कवलेवाडा गावातील शेतशिवारात घडली.नंदा किसन खंडाते वय ४७ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.घटनेनंतर वाघ घटनास्थळाजवळच ठाण मांडून बसला होता.
पाच दिवसांतील परिसरातील ही दुसरी घटना असून यापूर्वी याच वाघाने माटोरा येथे शुक्रवारी २४ जानेवारीला राजेश ताराचंद सेलोकर या ३५ वर्षीय तरुणाचा बळी बळी घेतला होता.या घटनेवरून गाव व परिसरात प्रचंड आक्रोश निर्माण झाला. वनविभागाने या नरभक्षी वाघाला ठार मारावे, अशी मागणी करण्यात आली.त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा व संतापाचा सामना करावा लागला.गावकऱ्यांनी वनविभागाच्या वाहनावर दगडफेकही केली.कवलेवाडा हे गाव कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येते.नंदा खंडाते यांचे शेत जंगलाला लागून आहे.त्या नेहमीप्रमाणे आपल्या शेतावर काम करीत होत्या.अचानक दडी मारून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार मारले.गेल्या आठवड्याभरापासून हा वाघ या परिसरातील गावांत हजेरी लावत आहे.माटोरा येथील घटनेनंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा हा वाघ याच परिसरात सर्पेवाडा तलावाजवळ आढळून आला होता.वनविभागाने आणि गावकऱ्यांनी फटाके फोडून त्याला हुसकावून लागले होते.गेल्या काही दिवसांपासून वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे.अशातच मानवी रक्ताची चटक लागलेल्या या वाघाने नंदा खंडाते यांचा बळी घेतला आहे.घटना घडल्यानंतर गावकऱ्यांत प्रचंड संताप आणि रोष पसरला होता.घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली. गावकरी महिलेच्या मृतदेहाजवळच ठाण मांडून बसले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या पथकाला गावकऱ्यांचा रोषाला सामोरे जावे लागले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!