Sunday, September 6, 2026
Homeआरमोरीवाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आरमोरी तालुक्यातील घटना..

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना आज,मंगळवार २ डिसेंबरला दुपारच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या इंजेवारी गाव नजिक परिसरातील शेतशिवारात घडली.कुंदा खुशाल मेश्राम वय ६२ वर्षे,रा.इंजेवारी,ता.आरमोरी, जि.गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
कुंदा मेश्राम ह्या आज सकाळच्या सुमारास इंजेवारी गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर गेल्या होत्या.बराच वेळ होऊनही आजी घरी परतली नसल्याने नातू किसन हा शेतावर गेला होता.शेतावर आजी दिसून न आल्याने किसन घरी परतला.नंतर त्याने कुटुंबीयांसह गावातील नागरिकांना सोबत घेऊन शेत गाठले.परिसरात शोध घेतला असता काही अंतरावरच कुंदा मेश्राम मृतावस्थेत आढळून आल्या.चेहऱ्यावर तसेच शरीरावरील इतर जखमा पाहून वाघानेच हल्ला चढवल्याचे तसेच परिसरात वाघ्याच्या पाऊलखुणा आढळून आल्याने कुंदा मेश्राम यांना वाघाने ठार केल्याचे निष्पन्न झाले.प्रकरणी घटनेची माहिती आरमोरी वनविभागास देण्यात आली व पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली.घटनेने परिसरात दहशत पसरली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!