Tuesday, August 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षली संघटना हादरली; कुख्यात नक्षली शरणागतीच्या वाटेवर..

नक्षली संघटना हादरली; कुख्यात नक्षली शरणागतीच्या वाटेवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ (PLGA)बटालियनचा कुख्यात नक्षलवादी  हिडमा माडवी याचा १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरक्षा दलांनी खात्मा केला.त्यानंतर ही चळवळ चांगलीच हादरली आहे.अश्यातच आता त्याचा विश्वासू साथीदार बारसे देवा शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहे.बारसे देवा जंगलातून सुरक्षित बाहेर येण्यासाठी सुकमा परिसरात एक कॉरिडोअर तयार करण्यात आला आहे.तो सरेंडर झाल्यास नक्षलवाद्यांची बटालियन जवळपास संपुष्टात येईल,असे म्हटले जात आहे.आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील एका चकमकीत जहाल नक्षलवादी हिडमा माडवी याचा सुरक्षा दलाने खात्मा केला.हिडमा याच्या मृत्यूनंतर छत्तीसगडच्या बस्तरची नक्षली संघटना चांगलीच हादरली आहे.हिडमा बस्तरच्या लोकल नेटवर्कला नक्षलवाद्यांशी जोडणारा महत्वाचा दुवा होता.हिडमा आणि बारसे देवा दोघेही सुकमाच्या पूर्वी गावाचे आहेत.दोन वर्षांपूर्वी हिडमाला सेंट्रल कमेटीमध्ये सहभागी करण्यात आले,तर त्याने बारसे देवाला ‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’ बटालियन नंबर एकचा कमांडर बनवला.मात्र,हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आणि हळूहळू सर्वच आत्मसमर्पण करू लागलेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!