Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूररेल्वेरूळ क्रासिंग करतांना ७३ वर्षीय वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू...

रेल्वेरूळ क्रासिंग करतांना ७३ वर्षीय वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नागभीड तालुक्यातील आकापूर ते बाळापूर रेल्वे मार्गावरील रेल्वेरुळ क्रॉस करीत असताना ७३ वर्षीय वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू असल्याची घटना आज, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. विश्वनाथ दुधकुरे वय ७३ वर्षे असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बाळापूर ते आलेवाही दरम्यान आकापूर गावाजवळुन चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्ग आहे.रेल्वेरूळ ओलांडताना आकापूर-डोरली रेल्वे बोगद्या असुन बोगद्यात पाणी साचून असते. त्यामुळे बालापूर,आकापूर,आलेवाही या रस्त्याने जाणारे अनेक वाटसरू बोगदा सोडून रेल्वे क्रासिंग करून ये-जा करीत असतात.दरम्यान आज,बुधवारी सोनापूर (तुकुम) येथील विश्वनाथ दुधकुरे हा इसम रेल्वेक्रासिंग करत होता.गोंदियाकडुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड इथे पाठविण्यात आले.बोगद्याचे बांधकाम सदोष असल्याने येथे पाणी साचतो व त्यामुळे या रस्त्याने जाणारे प्रवासी रेल्वेक्रासिंग करून प्रवास करीत असल्यामुळे या बोगद्यांना त्वरीत दुरुस्ती करावे; अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!